Followers

Monday, April 13, 2020

।। गुरूतत्व ।।

।। गुरूतत्व ।।
*मुक्त होण्यासाठी गुरूंना, संताना शरण जा, ते जे सांगतील ते कृतीत आणा तेव्हाच अहंकार दूर ....
*आपण खरोखर मुक्त आहोत का* ?याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. कारण *जो सदैव गुरूंशी,गुरूंच्या तत्वांशी एकरूप असतो त्याला भक्त म्हणतात ,जो कधीही विभक्त होत नाही तो भक्त*
भक्तीमध्ये *समर्पन व शरणागती असते.* ही दोन शब्द म्हणायला सोपी आहेत. मात्र याचा अंगीकार करणे, त्याप्रमाणे वागन्यासाठी *खूप प्रयत्न पूर्वक क्रियामान कर्म करावे लागते* .कारण जो पर्येंत *अहंकार दूर होत नाही तोपर्येंत,दुसऱ्याचे ऐकणे त्याप्रमाणे वागणे फार कठिणअसते.*
माझ्यातला मी ते मान्य करतच नाही. माझं माझ्यावर खूप प्रेम असते *.मला माझे दोष हे दिसतच नाही. सदैव दुसऱ्यांचे दोष मात्र दिसत असतात.स्वतःची वाहवा मिळविण्यातच त्याला सुख वाटत.* फक्त भौतिक सुख हे मलाच मिळावे, मी सुखी असावा असेच वाटत राहते. या *सुखाच्या मागे तो पळत असतो* नकारात्मक जीवन जगत असतो. यामुळे त्याला सदैव *भय, चिंता ,ताण तणाव ,शंका कुशंका येत असतात याच गोष्टी सदैव त्याला समर्पण व शरणागती यापासून दूर ठेवत असतात.*
नकारात्मक मन असल्यामुळे त्याच्यामध्ये निर्माण होणार विचार हे नकारात्मक असतात. ते असा विचार करतात की जर मी कोणाशी समर्पित झालो शरणागत झालो तर *माझं अस्तित्व संपेल असं होऊ नये म्हणून मन त्या व्यक्तीबद्दल मनामध्ये विचारांमध्ये विकल्प निर्माण करतो.* या *विकल्पा मुळेच माणूस शरणागत व समर्पित होत नाही.*
*जो पर्येंत माणूस हा भक्त होत नाही तो पर्येंत त्याला चिरंतन ,शाश्वत असा आनंद मिळत नाही. भक्त होण्यासाठी गुरूंना, संताना शरण जा, ते जे सांगतील ते कृतीत आणा तेव्हाच अहंकार दूर होईल*

No comments:

Post a Comment