Followers

Monday, April 13, 2020

आनंदप्राप्ती साठी तिसरी

**आनंदप्राप्ती साठी तिसरी पायरी आचरण आहे !*

आपल्या जीवनाचा खरा अर्थ जाणून घेणे हाच परमार्थ आहे , त्यासाठी क्रियामान कर्म करणे हीच आनंदप्रति साठी , द्वितीय पायरी आहे
परम अर्थ म्हणजे काय? तर माझा जन्म कशासाठी
झाला,या मागे काय कारण आहे. संत महात्मे म्हणतात *हा मानव जन्म 84 लक्ष योनी मार्गातून गेल्यावर मानवाचा जन्म मिळतो, ज्यात विचार करण्याची क्षमता असते,बुद्धिमत्ता असते, ज्या मुळे माणूस हा भक्त होतो व भक्ती करत भगवंत होऊ* शकतो , *भगवंत होणे म्हणजे आनंदी होणे , कुठलीही परिस्थिती असताना जो आंनदी राहतो तो भगवंत*
*लहान मुले ज्यांना काहीही कळत नाही, त्यावेळी ती भगवंत स्वरूपच असतात.* जस जशी मोठी होत जातात तस तसे त्यांच्यात *"मी' पनांची भावना निर्माण होऊन स्वार्थ वाढत जातो, परमार्थ दूर होत जातो* .हळू हळू त्याची "मी" पणाची भावना दृढ होत जाते व तो ईश्वरी गुणांन पासून दूर होत
जातो. *जन्म घेताना ज्या ईश्वर प्राप्तीचा भाव होता, तो विसरायला लागतो मी व माझे यात अडकत जातो,* शिक्षण घेतो ,त्यानंतर व्यवसाय किंवा नोकरी करतो , लग्न करतो, मुलंबाळं होतात, ती मोठी होतात त्यांची शिक्षणे मग त्यांची लग्ने त्यांना मुलबाळ हे करीत शेवटी मृत्यू पावतो, हे *जीवन जगताना स्वतःच्या स्वार्था साठी वाट्टेल ते कर्म करतो, कोणाला लुबाडतो,फसवतो, मारतो, भ्रष्टाचार करतो,हे सर्व कशासाठी तर स्वतःच्या प्रपंचासाठी* जो प्रपंच प्रारब्धाने होणारच होता तो करण्यासाठी *अमूल्य असे जीवन गमावतो.*
संपुर्ण जीवन प्रापंचिक सुखासाठी घालवून टाकतो, शेवटी म्हणतो *इतका प्रपंच केला , पैसा, गाडी , बंगला ज्यातून सुख मिळेल ते सर्व विकत घेतले पण तरी सुद्धा मनःशांती काही मिळाली नाही.* मनःशांती म्हणजे समाधान व समाधान म्हणजे आनंद .
*परमार्थातूनच आनंद मिळतो कारण , आनंद हा कुठल्याही भौतिक गोष्टी वर अवलंबून नाही* , फक्त तो आत्मसात करायला लागते *सत्कर्म हेच असते क्रियामान कर्म,सत्कर्म म्हणजे चांगले कर्म* ज्यामुळे प्रत्येक जीवाला मिळेल फक्त आनंदच. म्हणून सत्कर्म करा दुसऱ्याला आनंदी ठेवा , दुःख देऊ नका, फसवू नका, अडचणीत आणू नका,नितीभ्रष्ट होऊ नका, असे *आचरण युक्त जीवन जगणे म्हणजेच क्रियामान कर्म आहे*
*आनंदप्राप्ती साठी तिसरी पायरी हे आचरण आहे*
आज या पायरीचे चिंतन करा,

No comments:

Post a Comment