Followers

Wednesday, April 22, 2020

nagasadhu

नागा साधू बनण्याच्या प्रक्रियेत माणसाला त्याची आधीची ओळख व परिवार सोडावा लागतो.त्यांचे पूर्ण रजिस्टर उपलब्ध असते .नागा संप्रदाय विरक्ती च्या माध्यमातून जीवनमुक्ती शोधण्याचा प्रयत्न करतो.नागा साधू सुसंघटित असतात.देश किंवा धर्मावर घाला येतो असे दिसल्या शिवाय ते सार्वजनिक किंवा सामाजिक जीवनात हस्तक्षेप करत नाहीत.ते मितभाषी असतात.एखादा नागा साधू तुमच्या सोबत संभाषण करत असेल तर तो एक दुर्मिळ योग आणि पर्वणी असते.नागा साधूंच्या वर कधीही चोरी किंवा दरोड्याचा आरोप लागत नाही कारण सर्व नागा किमान मध्यम वर्गीय कुटुंबातून आहेत.नागा साधू बनायलाच माणूस संपत्ती त्यागून फक्त मोक्षाच्या मागे गेलेला असतो.
हिंदू व अगदी मुस्लिम समाजातील ही सर्व विचार व पक्षांचे नेते नागा साधूना आदर देतात व त्यांची इज्जत करतात.नागा शस्त्र व शास्त्र ह्या दोन्ही मध्ये निपुण असतात.न्यायव्यवस्था असेल की प्रशासन ,पोलीस असतील की सैन्यदल ..सर्व वर्गातील सर्व विचारांचे हिंदू लोक नागा साधूंचा आदर आपल्या कर्तव्या एवढाच करतात.
हे सगळे लिहायचा उद्देश्य एवढाच आहे की नागा साधू व आखाड्याने जर पालघर हत्याकांड मनावर घेतले असेल तर ते अतिशय गंभीर आहे.साधूंच्या वेशात दरोडे किंवा चोरी झाल्याच्या घटना मुळातच बघायला मिळत नाहीत.'साधू संत येती घरा,तोचि दिवाळी दसरा' ह्या तुकोबा रायांच्या उक्तीवर चालणाऱ्या महाराष्ट्रात साधूंची हत्या करणारे लोक नुसते हिंदुद्रोही नाहीत तर महाराष्ट्रधर्मद्रोही ही आहेत.पोलीस प्रशासनाने गंभीर्य ओळखून ह्या प्रकरणाचा लवकर छडा लावावा आणि जसे बहुतांश जणांना ह्या प्रकरणात जामीन मिळाले (कसे ते उद्धवजी नी सांगावे) ते मागे घेण्यासाठी कोर्टात विनंती करावी.ते त्या संशयित आरोपी लोकांच्या जीविताच्या हिताचे असेल.बाकी नागा साधूनी कुच केले यायला तर उत्तर प्रदेश ,बिहार ,गुजरात मध्ये त्यांना कुणी अडवणार नाही.त्यांना यावे लागणे हा कुठंतरी अतिशय दुर्बळ राजकीय नेतृत्व असल्याने लक्षण व व्यवस्थेचा पराभव झाल्याचे द्योतक असेल.त्यामुळं पोलिसांनीच आपली जबाबदारी ओळखून ह्या प्रकरणाचा कुठलेही दडपण न घेता छडा लावावा.
अतिशय दुर्गम भाग,जायला रस्ते नाहीत तिथं असे किती कोट्याधीश राहतात जेणेकरून तिथं चोरी दरोडे पडतील त्यांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जरा जाहीर करावी एखाद्या लाइव्ह मध्ये? कुणी चोरी करायला गेलं तर उलट स्थिती बघून हजार दोन हजार तिथं सोडून येतील स्वतःच्या खिशातले अशी स्थिती असणाऱ्या भागात असल्या अफवा उठवते कोण व त्या अफवा टिकतात ह्यावर कसा विश्वास ठेवावा आम्ही उद्धव जी ?कृपा करून लोकांना एवढे मूर्ख नका समजू.त्या साधूंचे वेष बघूनच त्यांची हत्या केली गेलीय हे सरळ दिसत असताना ही नेमके काय लपवायला बघत आहे गृह मंत्रालय ते ही स्पष्ट करा.
गृहमंत्री अनिल देशमुख ,तुम्हाला एरव्ही कोणत्याच गोष्टीची कल्पना नसते म्हणून कारवाई ला उशीर होतो म्हणता ना.तिथं कारवाई करायला झेपत नसेल व एवढाच सोशल वर लिहिणाऱ्या लोकांचा राग येत असेल तर माझ्यावर केस टाकून स्वतःचे समाधान करून घ्या.गृहमंत्री म्हणून तुम्ही सपशेल अपयशी ठरलाय.राजीनामा द्या असे तुम्हाला मी म्हणनार नाही कारण तो द्यायची नैतिकता तुमच्यात नाही.बाकी आपला राग व ताकद इथं फेसबुक वरील लोकांनाच दाखवा.
जय हिंद
हर हर महादेव 🚩

No comments:

Post a Comment