सगळ्यांना सगळं समजतच असं नाही....
कुरुक्षेत्रावर प्रभू श्रीकृष्णाने सांगितलेला गीता संदेश प्रत्यक्ष ऐकला तिघांनी. अर्जुन, संजय आणि धृतराष्ट्र. परंतु तिघांना गीता समजली किती आणि त्यांनी काय कृती केली?
अयोध्येत मंथरेला आणि लंकेत रावणाला राम म्हणजे कोण हे समजलेच नाही तेच राम भरत, हनुमान, शबरी, त्रिजटा, विभीषण यांना कसे समजले?
संदेश आणि व्यक्ती एकच असूनही समजून घेणारे मात्र आपापल्या पात्रतेने विषयाचा अर्थ काढत असतात. विषय आपल्याला समजला असं बऱ्याच जणांना वाटतं पण आपल्या मर्यादित दृष्टीत तो विषय प्रत्येकाला तितका समजलेला असतोच असं नाही.
यालाच Selective information processing म्हणतात. आपल्याकडे असलेल्या मर्यादित, पूर्वग्रहदूषित माहितीच्या आधारे प्रत्येक घटनेकडे बघण्याची प्रत्येकाची सवय असते. त्याच आधारावर आपल्याला घटना समजली असा भास होऊन बरेच जण आपला अभिप्राय, विरोध, समर्थन ठरवत असतात. उदाहरणार्थ, विहिरीत राहणाऱ्या बेडकाला समुद्र या शब्दाची व्याप्ती लक्षात येणं अशक्य आहे. त्याने समुद्राची केलेली कोणतीही कल्पना संकुचित, अपरिपूर्णच राहिल. परंतु दुर्दैव म्हणजे आपल्या समुद्राच्या परिकल्पनेलाच बेडूक सत्यस्थिती मानून वास्तव समजून घेण्यास पूर्णपणे नकार देतो.
रावणात सुद्धा काही गुण चांगले होते असे म्हणताना खरंच सर्वगुण संपन्न राम मात्र त्यांच्याकडून दुर्लक्षित ठेवले जातात कारण दृष्टीच तशी आहे. मेघनाद, कर्ण हे अधर्माच्या बाजूने असूनही त्यांच्यात काहीतरी योग्य शोधण्याचा प्रयत्न करतात.
याबाबतीत रामायणातील एक प्रसंग म्हणजे श्रीरामांनी केलेला बाली वध.
बालीला लपून का मारलं हे विचारताना बालीने सुग्रीवच्या पत्नीला का हिरावून घेतलं हे झाकून ठेवतात. बाली वानर असल्याने मनुष्याचे विवाह, कुटुंब नियम बालीला लागू कसे होतील असं म्हणतात पण मग वानर असेल तर झाडाआड लपून शिकार करणं अधर्म कसा याचा विचार मात्र केला जात नाही.
रावणाने बहिणीसाठी म्हणजे स्त्रीच्या स्वाभिमानासाठी युद्ध केलं म्हणून भाऊ असावा तर रावणासारखा कारण त्याने स्त्रीच्या( शूर्पणखेच्या) स्वाभिमानासाठी युद्ध केलं असं म्हणताना रावणाने एका स्त्रीला छळाने, प्रत्यक्ष युद्धाला घाबरून पळवून आणलं आणि तिला आपल्याकडे बंदिवान म्हणून ठेवलं, हा स्त्री अत्याचार का ठरत नाही?
लाखो लोकांची हत्या करून लाखो लोकांना सक्तीने धर्मांतरित करणारे मुघल, दीडशे वर्ष माणसं, संपत्ती आणि धर्म लुटणारे इंग्रज यांच्यापेक्षा आम्हाला आमचेच धर्मीय मात्र प्रखर शत्रू जाणवतात.
सितामातेचं हरण झाल्यानंतर जंगलात भटकत हजारो किलोमीटर प्रवास करून मातेचा शोध घेऊन तिच्या स्वाभिमानासाठी घनघोर युद्ध करणारे श्रीराम जेंव्हा सीतामातेचा त्याग करतात ते श्रीराम आम्हाला कसे समजतील?

तेवढी विकसित दृष्टी आहे आमची?
No comments:
Post a Comment