Followers

Monday, April 13, 2020

आनंदप्राप्ती साठी चौथी पायरी

**आनंदप्राप्ती साठी चौथी पायरी मन प्रसन्न ठेवणे आहे !*
(गुरुतत्त्वाचार हे सदर आपण सुरू केल्या पासून नियमित पणे आपण वाचत आहात, आपल्याला ते आवडत आहे, ते आपल्या अभिप्राय वरून कळत आहे.बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतोय की गुरू करायचा का? आपण गुरू करू शकत नाही तर आपण शिष्य म्हणून आपली पात्रता वाढवू शकतो)

*आचरण ला परमार्थात फार महत्व आहे, जे काही संतांचे वचन आपण ऐकतो ते जो पर्येंत आचरणात आणत नाही तो पर्येंत अपल्याला त्याची अनुभूती येणार नाही म्हणून आचरण म्हणजे वाईट सगळं सोडून चांगलंच वागणे म्हणजे आचरण .*
प्रारब्ध आपण ज्यावेळी स्वीकारतो की *मला जो त्रास होतो आहे ते माझेच कर्म आहे , मी कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी मला ते भोगल्या शिवाय पर्याय नाही,* त्याच प्रमाणे मला जो काही आर्थिक , शारीरिक त्रास झाला किंवा होतो आहे, *त्याला कोणीही दुसरा जवाबदार नाही. ज्याच्या कडून त्रास होतो आहे .ती व्यक्ती फक्त माध्यम आहे* .हे सत्य जेव्हा स्वीकारून त्या प्रमाणे जर आचरणात आले तर *मन शांत व्हायला सुरुवात होते,नाहीतर सदैव मनात अशांतता असते* . सतत दुसर्याबद्दल राग असतो, आतून जळण्याची प्रक्रिया सुरू असते. *यामुळे मनाला व शरीराला खूप त्रास होत असतो. यातूनच आजार निर्माण होतात.* व्यक्ती हा नकारात्मक होतो. *चिंता ,भय,व असुरक्षित मनात निर्माण होते.*
चिंता, भय व असुरक्षितता या तीन गोष्टी , *मन प्रारब्धात गुंतल्या मुळे निर्माण होतात, जे प्रसंग अजून घडले सुद्धा नाही, ते कल्पनेने तयार होतात व प्रचंड असा दाब किंवा जडत्व शरीराला येते,* यातून मग साखरेचे प्रमाण , ह्रयद्याची गती , रक्तदाब कमी जास्त या गोष्टी वाढतात कमी होतात .व हेच आज सर्वत्र मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
**यातून बाहेर पडण्यासाठी व आनंदमय जीवन जगण्यासाठी*
1)पहिली पायरी प्रारब्ध आनंदाने स्वीकारणे.
2) दुसरी पायरी सत्कर्म युक्त क्रियामान कर्म करणे.
3) तिसरी पायरी संत वचनाने आचरण करणे.
4) चौथी पायरी मन प्रसन्न ठेवा .
आज या पायरीचे चिंतन करा,
(उद्या आपण बघू मन प्रसन्न कसे ठेवायचे )

No comments:

Post a Comment