Followers

Monday, April 13, 2020



*मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥*

 *भाव व भावना, सेवा म्हणजे काय? काम म्हणजे काय? जाणून घेण्यासाठी 
या कडव्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात *मन हाच गुरू आहे तर मन हाच शिष्य आहे,मन हेच त्याला दास करतो तर मन हेच मनाला प्रसन्न ठेवतो, जीवनात चांगली गती किंवा वाईट अधोगती ,हे मनच देत असत,*
याचे अधिक चिंतन करू या,
आपल्या जीवनात *आपली गती म्हणजेच प्रगती सकारात्मकता किंवा अधोगती म्हणजे नकारात्मकता या दोन्ही मनावर अवलंबून आहे.* या कडव्यामध्ये तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगितले की *मन हाच गुरु असतो व त्याचे ऐकणारा मनच असतं.* मन सांगतो त्याप्रमाणे प्राप्त होतो. मन हे दास करतो,म्हणजे त्याचा गुलाम करतो. *व्यसनाच्या अधीन होणे हे गुलाम होणेच आहे.* आपल्या आजूबाजूला बघितले तर लक्षात येईल की *व्यसन हे फक्त नशेचच असत तर,पैसा, नाव, प्रॉपर्टी, अहंकार* याची सुद्धा असतात,यातून कितीतरी जण *दररोज अधोगती कडे जात असतात* .मन अपवित्र असेल तर त्याच्या मनामध्ये येणारे विचार हे अपवित्र असतात. नकारात्मक असतात.यामुळे त्याच्या *मनामध्ये जसे विचार येतात त्याप्रमाणे त्या शरीराला नकारात्मकता अनुभवास येते.*
श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की शरीर हे एक रथ आहे. या *रथामध्ये आत्मा हा राजा आहे ,तर त्याचा सारथी मन आहे.* त्याच्या हातामध्ये जि लगाम आहे *. ती म्हणजे बुद्धी आहे. या लगामला सहा घोडे बांधलेली आहे* . ती सहा घोडे म्हणजे षड्रिपू आहे. ज्यात काम,क्रोध, मोह,लोभ,मत्सर, मद हे *सहा षडरिपू ची लगाम बुद्धी आहे .बुद्धी ही मनाच्या आज्ञेने वागत असते.* *बुद्धी ही चांगलं वाईट यात अडकत नाही. ती फक्त मनाच्या आदेशाचे पालन करीत असते.*
*जर मन पवित्र असेल तर मन या शरीराच्या माध्यमातून आत्म्याचे मिलन हे परमात्म्याशी करून देते* व खऱ्या अर्थाने जीवन हे यशस्वी होते. जीवनाचे ध्येय साधले जाते.मात्र मन जर अपवित्र असेल, *मनातील विचारांप्रमाणे बुद्धी या षडरिपू ना घेऊन अपवित्र ठिकाणी जाते यामुळे आत्म्याला आत्मक्लेष होतात.*
अशाप्रकारे मन हे *या पंचमहाभूतांच्या शरीरामध्ये कुठलेही इंद्रिये नसून एक ऊर्जा आहे* व तिचा अंमल संपूर्ण शरीरावर असतो व त्याच्या विचारांप्रमाणे माणसाची गती व अधोगती होते. *हेच सत्य तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितले आहे* यावरून लक्षात आले असेल कि मनाचे सामर्थ्य किती आहे.
उद्या आपण तिसऱ्या कडव्याचे चिंतन करूया

No comments:

Post a Comment